येथील पत्रकार व शेतकरी रवि आनंदराव ठुमणे (53) रा. विद्यानगरी यांच्या आत्महत्ये प्रकरणी नवीन खुलास्याने एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येपूर्व डायरीमध्ये लिहिलेल्या सुसाइड नोटवरुन मृतकाचे पुत्राने वणी पोलिस ठाण्यात वणी येथील एका व्यावसायिकासह 5 जणांविरुद्ध त्याच्या वडिलांची आर्थिक फसवणूक, मानसिक छळ व आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार दिली आहे. पत्रकार रवी ठुमणे यांनी 15 डिसेंबर 2025 रोजी आपल्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली होती.