महानगर निवडणुकीत कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये,आचार संहिता पालन करत कायदा शिस्त अबाधित राहण्यासाठी सातपूर पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. निवडणूक काळात तगडा पोलिस बंदोबस्त राहणार आहे. त्यानुषंगाने सोमवार (दि 22 ) सातपूर पोलीस स्टेशन हद्दीत पपया नर्सरी, समृद्धी नगर, अशोक नगर,नागरे चौक, श्रमिक नगर कार्बन नाका परिसरात पोलीस व्हॅन गाडीतून पोलीस संचलन काढण्यात आले या वेळी,आर मोबाईल डिबी मोबाईल बिट मार्षल, आदी उपस्थित होते.