कर्जत: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी कर्जत येथे पार पडली सकल मराठा समाज बांधवांची बैठक
Karjat, Raigad | Aug 24, 2025 मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हे 29 ऑगस्ट पासून मुंबई येथील आझाद मैदानात उपोषण सुरू करणार आहेत.त्यांच्या उपोषणाला सकल मराठा समाज बांधव कर्जत तालुका यांच्यावतीने पाठिंबा देत बहुसंख्येने आझाद मैदानात उपस्थित राहणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या बांधवांनी दिली आहे.