४ जानेवारीपासून साताऱ्यातील शाहू नगरी साहित्यिकांच्या, विचारवंतांच्या आणि रसिकांच्या उपस्थितीने गजबजणार आहे. एकीकडे नगरपालिका निवडणुकांचा धुराळा सुरू असला, तरी या साहित्य संमेलनाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळेल, असा विश्वास मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज मंगळवार दिनांक 16 डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता व्यक्त केला आहे.या संमेलनासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, राज्यातील प्रमुख मंत्री, तसेच नामवंत साहित्यिक मोठ्या संख्येने साताऱ्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.