घरगुती एलपीजी गॅसचा अवैध वापर व काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. बुधवार दि. 11 मार्च 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर यांनी सर्व तालुकास्तरीय अधिकार्यांना घरगुती गॅसच्या वितरणावर लक्ष ठेवून नियमित तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत.शासनाच्या निर्देशानुसार घरगुती एलपीजी गॅसच्या वापराबाबत केंद्र सरकारच्या पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयासह पीपीएसी,पीएनजीआरबी यांचे नियम पाळण्याच्या सूचना दिल्या.