मानगाव: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी! माणगाव परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा.@raigadnews24
Mangaon, Raigad | Oct 19, 2025 दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आणि लागोपाठ आलेल्या सुट्ट्यांमुळे कोकणात जाणाऱ्यांची गर्दी वाढली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव परिसरात तब्बल ३ ते ४ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. कोकणगावाकडे जाणाऱ्या लेनवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.