पुसद: भडंगी तांडा शेतशिवारात एकास लाकडी काठीने मारहाण,आरोपी विरुद्ध पुसद ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल
Pusad, Yavatmal | Oct 22, 2025 फिर्यादी जानकाबाई लक्ष्मण मोरे यांच्या तक्रारीनुसार 21 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजताच्या सुमारास आरोपी सुनील मोतीराम राठोड याचे गुरे ढोरे फिर्यादीच्या शेतामध्ये येऊन कापूस खात असताना फिर्यादीने आरोपीस हटकले असता आरोपीने फिर्यादी सोबत वाद करून शिवीगाळ केली तसेच लाकडी काठीने मारहाण करून जखमी केले व जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी 21 ऑक्टोबरला सायंकाळी अंदाजे सहा वाजताच्या सुमारास पुसद ग्रामीण पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.