आगामी जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. जळगाव महापालिकेत आता भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मिळून 'महायुती' म्हणून निवडणूक लढणार असल्याची अधिकृत घोषणा शनिवारी 27 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आली आहे.