नेवासा: महामार्गाची खड्ड्यांमुळे चाळण ; वाहनचालकांसह नागरिकांना संताप
छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर महामार्गाची मोठमोठे खड्डे पडल्याने बिकट अवस्था झाली आहे. महामार्गाच्या दुरुस्तीसाठी घोडेगाव, वांजोळी पांढरीपूल येथील ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलनेही केले होते. विविध संघटनेने आंदोलने करूनही काहीही परिणाम झाला नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन महामार्गाच्या दुरुस्तीसाठी मागणी केली आहे.