जुन्नर: माझ्यावर अन्याय झालाय. मला अडकवलंय.. देवराम लांडेंना येरवड्याला नेलं.
Junnar, Pune | Sep 15, 2025 जुन्नर येथे वाढदिवसाच्या मिरवणुकीदरम्यान डीजे-गाडीच्या धडकेमुळे एका युवकाचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले. या घटनेतील मुख्य आरोपी आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम लांडे यांना जुन्नर न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर आज त्यांना येरवडा कारागृहात नेण्यात आले.