भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील धारगाव शिवारात आज २० जानेवारी रोजी पहाटे ५:४५ च्या सुमारास काळजाचा थरकाप उडवणारा भीषण अपघात घडला असून, यामध्ये एका ३० वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हनुमान नगर, लाखनी येथील रहिवासी संकेत सुखदेव सपाटे (वय ३०) हे आपल्या स्कुटी (क्रमांक MH 36 AM 4506)ने भंडाऱ्याहून लाखनीकडे जात असताना, धारगाव येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रक (क्रमांक CG 04 MB 7696)वर त्यांची स्कुटी पाठीमागून....