शहादा: सारंगखेडा गावात अंगणात उभी केलेली दुचाकी चोरट्याने लांबवली, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
शहादा तालुक्यातील सारंगखेडा गावात घराच्या अंगणात उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शहादा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गौतम राजेश इंदवे राहणार सारंगखेडा यांची दुचाकी अंगणात उभी केली होती मात्र अज्ञात यांनी रात्रीची संधी साधत दुचाकी क्रमांक इमेज 39 एएफ 2935 चोरून नेली आहे.