पेण: वडखळ पोलीस ठाणे हे ISO प्रमाणपत्र मिळवणारे जिल्ह्यातील अग्रगण्य पोलीस ठाण्यांपैकी एक ठरले
Pen, Raigad | Apr 20, 2025 वडखळ पोलीस ठाणे हे रायगड जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट व 'स्मार्ट' पोलीस स्टेशन म्हणून गौरवण्यात आले आहे. या ठाण्याने गेल्या काही काळात दाखवलेली जबाबदारीची जाण, प्रामाणिक कार्यशैली, परिसरातील स्वच्छता, व्यवस्थापनातील नेटकेपणा, तसेच अभिलेख व्यवस्थापनातील आधुनिकीकरणामुळे हे ठाणे इतरांसाठी एक प्रेरणास्थान बनले आहे. विशेष म्हणजे, वडखळ पोलीस ठाणे हे ISO प्रमाणपत्र मिळवणारे जिल्ह्यातील अग्रगण्य पोलीस ठाण्यांपैकी एक ठरले आहे. हे प्रमाणपत्र कार्यप्रणाली, सेवांची गुणवत्ता व नागरिकांशी सौहार्दपूर्ण