भुसावळ: विद्यार्थिनींना स्कार्फ बांधून धार्मिकस्थळी नेल्याने खळबळ, हिंदुत्ववादी संघटनांनी सेंट ॲलॉयसिस स्कूलला विचारला जाब
भुसावळ येथील सेंट ॲलॉयसिस स्कूलने धार्मिक सहलिच्या नावाखाली विद्यार्थिनींना स्कार्फ बांधून विविध धार्मिकस्थळी नेल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत हिंदुत्ववादी संघटनांनी या शाळेत जाऊन जाब विचारला. दरम्यान, या प्रकारामुळे शाळा प्रशासन व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. मात्र, या प्रकरणी कुठल्याही प्रकराची फिर्याद दाखल नसल्याची माहिती दि. १४ सप्टेंवर रोजी शहर पोलीस स्टेशनतर्फे देण्यात आली आहे.