रेणापूर: तालुक्यातील सिंधगाव येथे वंचित बहुजन आघाडीची संवाद बैठक संपन्न
Renapur, Latur | Sep 26, 2025 आज दिनांक २६ सप्टेंबर २०२५ रोजी रेणापूर तालुक्यातील सिंधगाव येथे- येथील मुस्लिम समाज बांधवांनी वंचित बहुजन आघाडीचे लातूर जिल्हा अध्यक्ष .सलीम सय्यद यांना बोलावून मुस्लिम समाज बांधवा सोबत बैठक आयोजित केली. या बैठकीत जिल्हा अध्यक्ष .सलीम सय्यद यांनी येथील मुस्लिम बांधवा सोबत संवाद साधला व येथील मुस्लिम समाजाच्या विविध समस्या जाणून घेतल्या यात प्रामुख्याने अनेक वर्षांपासूनचा मुस्लिम समाजाच्या कबरस्तानचा विषय येथील मुस्लिम समजाकडून मांडण्यात आला.