उदगीर शहरातील देगलूर रोडवर एकास टॉमीने मारहाण केल्याची घटना घडली आहे याप्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात १४ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पोलिसांनी दिलेली माहिती अशी १४ डिसेंबर रोजी रात्री देगलूर रोडवर फिर्यादी हातगाड्याजवळ केळी खात असताना आरोपींने तू केळी का घेतलास ते केळी ठेव असे म्हणून शिवीगाळ करून हातात टॉमी घेऊन टॉमीने मारून जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली याप्रकरणी बळीराम सीताराम पवार यांच्या फिर्यादी वरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे