कोपरगाव: वारी येथील गोदावरी नदीत पडून बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह आढळला
कोपरगाव तालुक्यातील वारी येथील गोदावरी नदीत रविवारी रात्री पाण्यात पडून बेपत्ता झालेला जयेश गणेश पेंढारे वय 21, रा. धोत्रे याचा मृतदेह आज 6 नोव्हेंबर रोजी सकाळी घटनास्थळापासून 11 वाजता सुमारे 4 किलोमीटर अंतरावर सापडला आहे. जयेशचा शोध कोपरगाव नगरपालिकेच्या आपत्कालीन पथकाकडून काल सकाळपासून सातत्याने सुरू होता. अखेर आज या पथकाला यश मिळाले असून, मृतदेह कर्मचारी आणि गावकऱ्यांच्या मदतीने पाण्यातून बाहेर काढण्यात आला आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी शव कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला