विक्रमगड: नैसर्गिक शेती प्रशिक्षण कार्यक्रम चिंचणी, आसनगाव येथे संपन्न
कृषी विज्ञान केंद्र कोसबाड हील व आत्म कृषी विभाग डहाणू यांच्या संयुक्त विद्यमाने नैसर्गिक शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शास्त्रज्ञ भरत कुशारे यांनी आसनगाव चिंचणी येथे नैसर्गिक शेती विषयक प्रशिक्षण दिले. नैसर्गिक शेतीचे तत्व फायदे, पिक फेरबदल, जीवामृत, बिजामृत, दशपर्णी अर्क यांचे प्रात्यक्षिकांसह सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांना कृषी योजनांविषयी देखील माहिती देण्यात आली मोठ्या संख्येने परिसरातील शेतकरी प्रशिक्षणास उपस्थित होते.