गोंदिया शहराचा सर्वांगिन विकास करुन शहरवासीयांना दर्जेदार मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी खा. श्री प्रफुल पटेलजी यांच्या नेतृत्वात विविध विकास कामे करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदैव कटिबध्द राहिल. शहरात विविध विकास कामे करुन कायापालट करण्यास आमचे नेहमीच पहिले प्राधान्य राहिले आहे. पण शहरवासीयांचा विश्वास आणि सहकार्याशिवाय हे शक्य नाही. त्यामुळे गोंदिया शहराचा सर्वांगिन विकास करण्यासाठी शहरावासीयांनी सक्षमपणे उभे राहावे असे आवाहन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले.