लोणार: हत्ता येथे पत्रकारासह पत्नीवर हल्लाप्रकरणी मुख्य आरोपीस अटक
Lonar, Buldhana | Sep 16, 2025 लोणार तालुक्यातील हत्ता येथे 10 जून रोजी रात्री दरम्यान तुफान वाद झाला होता. एका पत्रकारासह त्यांच्या पत्नीवर अमानुष हल्ला करण्यात आला होता. पीडित कुटूंबांनी जवळच्या लोणार पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी शरद राम पवार, विकास किसन पवार, दिलीप गोविंद पवार, संदीप गोविंद पवार, विजय किसन पवार, गोविंद हरी पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.15 सप्टेंबर रोजी आरोपीची माहिती मिळताच लोणार पोलिसांनी मुख्य आरोपी विकास पवार याला अटक केली आहे.