लाखांदूर: इटान येथे कोंबडा बाजारावर धाड; लाखांदूर पोलिसांची कारवाई, एक लाख 40 हजार चा मुद्देमाल जप्त
वैनगंगा नदी घाट परिसरात अवैधरित्या कोंबड्यांच्या बाजार भरून पैशावर हारजीचे शर्यत लावल्या जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करून एकूण चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून एक लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई 19 ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान तालुक्यातील ईटान येथील वैनगंगा नदी घाट परिसरात करण्यात आली