केंद्र आणि राज्य सरकारच्या मनरेगा विरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आयोजित करण्यात आलेले 'मनरेगा बचाव' आंदोलन आज दिनांक 13 जानेवारी रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजता पर्यंत त्रिमूर्ती चौक येथे यशस्वीरित्या पार पडले. काँग्रेस जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांच्या प्रमुख नेतृत्वात झालेल्या या लक्षणीय उपोषणाने प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. शेकडो कार्यकर्त्यांनी यावेळी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. याप्रसंगी बोलताना मोहन पंचभाई यांनी सरकारवर कडाडून टीका करत..