अमळनेर नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांच्या पदग्रहण सोहळ्यात माजी आमदार शिरीष चौधरी यांनी गुरूवारी १ जानेवारी रोजी आमदार अनिल पाटील यांच्या पत्नीबद्दल केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे शहरात संतापाची मोठी लाट उसळली आहे. या वक्तव्याचा निषेध म्हणून शुक्रवारी २ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता हजारो महिला आणि कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून शिरीष चौधरी यांच्या विरोधात तीव्र निदर्शने केली.