घनसावंगी: घनसावंगीचे माजी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष गणेश कोरडे यांचा शिवसेनेत (शिंदेगट) प्रवेश
घनसांवगी चे माजी व्यापारी महासंघ अध्यक्ष श्री.गणेशराव कोरडे यांनी आज आमदार हिकमत दादा उढाण यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. दादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत गणेशराव कोरडे यांनी शिवसेनेच्या ध्येयधोरणांवर प्रेरित होऊन पक्षात प्रवेश केला.या प्रसंगी आमदार हिकमत दादा उढाण यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.