चाळीसगाव: महामार्गावर अपघातातील जखमीला 'जगतगुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्य महाराज संस्थान'च्या रुग्णवाहिकेद्वारे ता
चाळीसगाव: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211, धुळे-संभाजीनगर मार्गावर, जिव्हाळा गार्डन हॉटेलजवळ दि. 20 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 4 वाजून 45 मिनिटांनी झालेल्या एका अपघातात एक तरुण गंभीर जखमी झाला. या अपघाताची माहिती मिळताच जगतगुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्य महाराज संस्थान, नानिज्धाम यांच्या 24 तास विनामूल्य सेवा देणाऱ्या रुग्णवाहिकेने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमीला चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.