कारंजा: कारंजा तालुक्यातील 51 गावातली शेतकऱ्यांना मिळणार सौर कुंपण.. आमदार सुमित वानखडे यांच्या प्रयत्नांना यश..
आमदार सुमित वानखडे यांच्या प्रयत्नांना यश आले असून कारंजा तालुक्यातील 51 गावातील शेतकऱ्यांना आता सौर ऊर्जा कुंपणाचा लाभ होणार आहे वन्य प्राण्यापासून पिकाच्या नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना आपला जीव मुठीत घेऊन शेतातील पिकाची संरक्षण करावे लागते रात्री जागरण करावे लागते.यासाठी आमदार सुमित वानखडे यांच्या प्रयत्नाने डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेअंतर्गत सौर ऊर्जा कुंपणाचा लाभ देण्यासाठी शासनाने संवेदनशील गावाची निवड करून शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला