जाफराबाद: शेलुद येथे मयत शेतकऱ्याच्या घरी माजी आमदार चंद्रकांत पाटील दानवे यांनी दिली सांत्वन पर भेट
आज दिनांक 18 नंबर 2025 वार शनिवार रोजी दुपारी 1 वाजता भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे शरदचंद्रजी पवार गटाचे माजी आमदार चंद्रकांत पाटील दानवे यांनी मतदार संघातील शेलुद येथे मयत शेतकऱ्याच्या घरी सांत्वन पर भेट दिली आहे, ज्ञानेश्वर रामदास मोरे यांचे नऊ दिवसापूर्वी दुःखद निधन झाले असता या मोरे परिवाराला या दुःखातून सावरण्यासाठी दानवे यांनीही भेट दिली आहे, याप्रसंगी गावातील पदाधिकारी कार्यकर्ते व मोरे परिवारातील सदस्य उपस्थित झाले होते.