तेल्हारा: ४ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, आरोपीस २० वर्ष सश्रम कारावास, जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल..
हिवरखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत चार वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या दिनकर भास्कर दांडगे वय ५० यास विशेष न्यायालयाने २० वर्षे सश्रम कारावास आणि ६० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. हा निकाल ४ जुलै रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश बी. एम. पाटील यांच्या न्यायालयाने घोषित केला.