राहाता: धमाका दिल्लीत.. तपासणी शिर्डीत...
काल रात्री दिल्ली येथे झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभुमीवर शिर्डीत पोलिसांकडून नाकाबंदी केली जात असून मुंबई-पुणे इंदौर अशा भागातून येणा-या वाहनांची सखोल तपासणी केली जात आहे. शिर्डी पोलीसांचा पथकानं शिर्डीच्या प्रवेशव्दारावरचं बॅरीगेटींग करत वाहनाची तपासणी सुरु केली आहे. साई मंदिरात देखिल सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्याचं दिसून येत आहे. शिर्डी हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असल्याने ही खबरदारी घेण्यात येत आहे.