मुखेड: एकलारा येथे किरकोळ वादाच्या कारणावरून २२ वर्षीय तरूणास गंभीर दुखापत केली; मुखेड पोलिस ठाण्यात 3 आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल
Mukhed, Nanded | Nov 16, 2025 नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील मौजे एकलारा येथे दि 13 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास यातील आरोपी 1) शिवाजी पडवळ 2) रविकांत देवकते 3) मशनरी गुरसुडे यांनी किरकोळ वादाच्या कारणावरून यातील फिर्यादी विनेश गवते वय 22 वर्षे यास डोक्यास गंभीर दुखापत केली व जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी फिर्यादी गवते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज दुपारी मुखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असुन पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गिते आज करीत आहेत.