कळमनूरी: येहळेगाव तु .येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व विजेत्या खेळाडूंचा सत्कार व बक्षीस वितरण
कळमनुरी तालुक्यातील येहळेगाव तुकाराम येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये आज दिनांक 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती दिन जिल्हा परिषद शाळा आणि रेणुकाई क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व विजेत्या खेळाडूंचा सत्कार करून बक्षीस वितरण करण्यात आले आहे याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक,गावकरी,शाळेचे शिक्षक तसेच विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती .