कोपरगाव: शहरातील विविध विकास कामासाठी चार कोटी नऊ लाख रुपयांच्या निधीला शासनाकडून मान्यता, आ.आशुतोष काळे
कोपरगाव शहरातील सर्वांगीण विकासासाठी आणखी एक महत्वाचा टप्पा गाठण्यात यश मिळाले आहे. कोपरगाव शहरातील विविध विकास कामांसाठी एकूण ०४ कोटी ९ लाख रुपयांच्या निधीला शासनाकडून प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असल्याची माहिती आज २८ ऑक्टोबर रोजी आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.कोपरगाव शहरातील नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यासाठी व शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आ. आशुतोष काळे यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु आहे.