राज्यमंत्री एड.आशिष जयस्वाल यांच्या नेतृत्वात गुरुवार दिनांक 15 जानेवारीला दुपारी दोन वाजताच्या दरम्यान त्यांच्या जनसंपर्क कार्यालय रामटेक येथे पारशिवनी नगरपंचायतच्या अपक्ष नगरसेविका प्रीती खुबाळकर यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. समाजसेवक मनोज पालीवाल यांच्या उपस्थितीत आपल्या सहकाऱ्यांसह भगवा डुपट्टा घालून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी राज्यमंत्री एड.आशिष जयस्वाल यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.