भरधाव कार आणि रिक्षाची धडक होत अपघातात रिक्षा चालकाचा मृत्यू झाल्याची घटना नाना धाब्याजवळ शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली.लक्ष्मण काशिनाथ इंगळे वय 45 वर्षे राहणार कोल्ही असे घटनेतील मयताचे नाव आहे.या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार लक्ष्मण यांच्या रिक्षाची एनएच 752 एच वर नाना धाब्याजवळ कारशी धडक झाली या अपघातात लक्ष्मण गोरे यांचा मृत्यू झाला.