उदगीर: उद्याच्या मोर्चात हजारोंच्या संख्येने बंजारा बांधवांनी सहभागी व्हावे,ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे संजय राठोड यांचे आवाहन
Udgir, Latur | Sep 15, 2025 राज्यातील तमाम बंजारा बांधवांना राज्य सरकारने हैद्राबाद गॅझेट लागू करून एसटी आरक्षण द्यावे यासाठी राज्यातील बंजारा बांधव आक्रमक झालाय,बंजारा समाजाच्या न्याय मागणीसाठी हीच योग्य वेळ असून बंजारा बांधव घरात बसू नये, आपल्या हक्काच्या मागणीसाठी आपणाला रस्त्यावर उतरावेच लागेल,१६ सप्टेंबर रोजी उदगीर तालुका सकल बंजारा बांधवांच्या वतीने नाईक चौक येथून मोर्चा काढण्यात येणार असून या मोर्चात उदगीर तालुक्यातील हजारो बंजारा बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन संजय राठोड यांनी केले आहे