आगामी महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर नागपूर जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर, नरसाळा आणि दिघोरी परिसरातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. कोराडी येथील जनसंपर्क कार्यालयात हा सोहळा पार पडला असून, यामुळे कामठी मतदारसंघात भाजपची पकड अधिक मजबूत झाली आहे.