दारव्हा तालुक्यातील बोदेगाव येथे चौकात खुलेआम जुगार खेळला जात असल्याबाबत ग्रामस्थांनी दिलेल्या तक्रारीनंतर दारव्हा पोलिसांनी मोठी कारवाई करत जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत पाच आरोपींना अटक करण्यात आली असून तीन आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार झाले आहेत.