पुणे शहर: सारसबागेत आज दिवाळी पाडव्यानिमित्त दिवाळी पहाटचे आयोजन, दोन गटात वाद
Pune City, Pune | Oct 22, 2025 पुण्यातील सारसबागेत आज दिवाळी पाडव्यानिमित्त दिवाळी पहाटचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान धक्का लागल्यामुळे दोन गटात किरकोळ वाद झाला. पोलिसांच्या मध्यस्थीने वाद शमला. चार ते पाच जणांकडून एकमेकांना शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली. दरम्यान यामुळे काही काळ वातावरणात तणाव निर्माण झाला होता.