"जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या ग्रामीण लोकशाहीच्या कणा असून, या निवडणुकांबाबत संशय किंवा अविश्वासाचे वातावरण राहिल्यास राज्याच्या लोकशाही आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम होतील, त्यामुळे आगामी निवडणुका ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात," अशी आग्रही मागणी आमदार नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली होती. जनभावनेचा आदर करून पारदर्शकतेसाठी ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेचा वापर करावा, असे पटोले यांनी आपल्या निवेदनात म्हटले होते....