धुळे: दुष्काळात अनोखा आदर्श: फुलांऐवजी मदतीचा धनादेश, देवपूरात धुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून मुख्यमंत्र्यांचे अनोखे स्वागत !
Dhule, Dhule | Sep 27, 2025 राज्यातील ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर धुळे पोलिसांनी संवेदनशीलतेचा आदर्श ठेवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यात गुलाबफुलाऐवजी ५० अधिकाऱ्यांच्या पगारातून जमा झालेले दोन लाख रुपये ‘मुख्यमंत्री सहायता निधी’साठी सुपूर्द करण्यात आले. शेतकऱ्यांच्या वेदना कमी करण्याचा हा प्रयत्न पोलिसांच्या माणुसकीचे व सामाजिक बांधिलकीचे प्रतीक ठरला. धुळे पोलिसांच्या या अनोख्या स्वागताचे सर्वत्र कौतुक होत असून ते प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.