राहाता: पुणे येथील सर्वसामान्य भाविकाकडून साईचरणी तब्बल १३ लाखांचा सुवर्ण कडा दान..
शिर्डीच्या साईबाबांना सोनं-चांदीचं दान मिळणं आता काही नवीन राहीलं नाही. मात्र एखादा साधारण कुटुंबातील भाविक जेव्हा आपल्या निस्सीम श्रद्धेतून लाखो रुपयांच सुवर्णदान करतो, तेव्हा त्या दानामागची श्रद्धा अधिक प्रबळ होताना दिसून येतय.. पुण्यातील नारायणगाव येथील साईभक्त साधना सुनिल कसबे यांनी आज मध्यान्ह आरतीवेळी साईचरणी 123 ग्रॅम वजनाचे आकर्षक नक्षीकाम असलेले सुवर्णकडे अर्पण केले. या कड्याची किंमत तब्बल 13 लाख 12 हजार रुपये आहे. आरतीदरम्यान हे कडे साईबाबांच्या चरणी परिधान करण्यात आलं.