धुळे शहराला हादरवणाऱ्या गुरुद्वारा प्रबंधक बाबा धीरज सिंग हत्या प्रकरणात तपासाला वेग आला आहे. १ डिसेंबरच्या तलवारीच्या हल्ल्यानंतर गंभीर जखमी झालेले बाबा ९ डिसेंबरला मुंबईत मरण पावले. गुन्ह्यात कलम १०३ वाढवण्यात आले असून, आरोपी उमेश माळोदे याला प्रकृती अस्वास्थ्यामुळे १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. सूत्रधार व हत्येचा उद्देश अद्याप गूढच आहे.