डिलेव्हरी पेशंट घेवून जाणारी कार पलटी;शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील घटना
Beed, Beed | Nov 10, 2025 बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात, आज सोमवार, दि. 10 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास, एक अपघाताची घटना घडली आहे. रस्त्याचे आणि नाल्याचे काम सुरू असताना, एमएच 23 बीसी 5822 या क्रमांकाची कार नाल्यात पलटी झाली. कारमध्ये डिलिवरीचे पेशंट घेऊन जात असल्याची माहिती मिळाली आहे.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, रस्त्याचे काम सुरू असताना सुरक्षिततेच्या उपाययोजना न केल्याने ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे.