कोपरगाव: सावळीविहीर-कोपरगाव रस्त्याच्या अपूर्ण कामावरून आ. आशुतोष काळेंनी ठेकेदाराला सुनावले
एन.एच.७५२ जी या राष्ट्रीय महामार्गावरील सावळीविहीर-कोपरगाव रस्त्याचे काम अंतिम टप्यात असून राहिलेले काम अतिशय धीम्या गतीने सुरु असल्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. आ. आशुतोष काळे यांनी पुणतांबा फाटा येथे झालेली वाहतूक कोंडी पाहून त्याचवेळी या रस्त्याच्या ठेकेदाराला भ्रमणध्वनीवरून चांगलेच सुनावले. तो व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत असून ठेकेदाराबाबत आ. आशुतोष काळेंनी घेतलेल्या कडक भूमिकेचे नागरिकांनी स्वागत केले आहे.