राज्यात झालेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. या मध्ये महायुतीला भरघोस यश मिळालं आहे. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते आज दिनांक 21 डिसेंबर रोजी दुपारी 4च्या सुमारास लुईस वाडी येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. जे घरी बसले त्यांना घरी बसवलं अस म्हणत त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.