घनसावंगी: कु.पिंपळगाव येथे मुस्लिम समाजाच्या वतीने भव्य इस्तेमा आयोजन: आमदार उढाण यांची हजेरी
घनसावंगी तालुक्यातील कु.पिंपळगाव येथे मुस्लिम समाजाच्या वतीने भव्य इस्तेमा आयोजित करण्यात आला होता .या कार्यक्रमाला आमदार हिकमत दादा उढाण यांनी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांची भेट घेतली. या प्रसंगी आमदार हिकमत दादा उढाण यांनी महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मौलाना हाफिज मजूर साहेब यांची विशेष भेट घेऊन स्नेहपूर्वक संवाद साधला.