पुरंदर: थापेवाडी येथे अवैध रित्या विदेशी दारू विक्री प्रकरणी सासवड पोलिसांची कारवाई
Purandhar, Pune | Apr 19, 2024 पुरंदर तालुक्यातील थापेवाडी येथे विदेशी दारू विक्री प्रकरणी पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे. दिनांक 17/ 4/ 2024 रोजी सायंकाळी साडेसहा वाजलेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी सासवड पोलिसांनी आरोपी अमोल न्यानोबा खवले राहणार थापेवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, त्याच्याकडून विक्रीसाठी असलेला दारूसाठा देखील जप्त करण्यात आला आहे.