श्रीरामपूर: श्रीरामपूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे नुकसान नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी
श्रीरामपूर तालुक्यात आज 16 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजेच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला असून या पावसामध्ये शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तरी प्रशासनाने तातडीने या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.