अल्पवयीन फिर्यादीच्या तोंडी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन सावनेर येथे माहिती तंत्रज्ञान अधिनियम अन्वये गुन्हा नोंद झालेला होता सदरचा गुन्हा दिनांक 27 फेब्रुवारी 2023 ते दिनांक 24 फेब्रुवारी 2024 दरम्यान घडलेला होता सदर गुन्ह्याचा सखोल तपास करून दिनांक 20 डिसेंबर रोजी त्यातील नमूद आरोपी आदर्श गणपत महोतकर यास चार वर्ष सक्षम कारावास व चार हजार रुपये दंड ही शिक्षा सुनावण्यात आलेली आहे