देवठाणा येथे ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्य सेवा मिळावी, या उद्देशाने उभारण्यात आलेल्या 59 लाख रुपये खर्चाच्या नवीन आरोग्य उपकेंद्राचे उद्घाटन आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. बुधवार दि. 24 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार आमदार बबनराव लोणीकर यांनी ग्रामीण भागात आरोग्य उपकेंद्राची नितांत गरज असल्याचे नमूद केले. आजारपणाच्या वेळी प्राथमिक उपचारांसाठी असे आरोग्य उपकेंद्र महत्त्वाची भूमिका बजावतात असेही लोणीकर यांनी म्हटले.